Fraud from fast tags ratnagiri toll Fraud marathi news 
कोकण

अजबच ! गाडी चिपळुणात, अन् टोल पुण्यात

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : एटीएम आणि ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दररोज समोर येत असतानाच आता चक्क वाहनांसाठी आणलेल्या ‘फास्ट टॅग’वरूनही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.  खेर्डी येथे गाडी उभी असताना पुणे - शिवापूर खेड टोलनाक्‍यावर फास्ट टॅगवरून गाडीची टोल रक्कम कापली गेली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत चिपळूण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 


खेर्डी येथील अभिजित शशिकांत जाधव यांनी याची तक्रार दाखल केली आहे. त्यांनी चिपळूण एचडीएफसी बॅंकेच्या शाखेतून २०२० मध्ये  फास्ट टॅग घेतला होता. १९ नोव्हेंबर २०२० ला त्यांची गाडी खेर्डी येथील निवासस्थानी होती. मात्र खेड - शिवापूर - पुणे या टोलनाक्‍यावरून सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी त्यांची गाडी गेली आणि ९५ रुपये टोल घेतल्याचा संदेश जाधव यांच्या मोबाईलवर आला. २० नोव्हेंबरला त्यांनी बॅंकेत जाऊन याची तक्रार नोंदवली. फास्ट टॅगला मेल केला व कॉल सेंटरवरही तक्रार रजिस्टर केली. वारंवार टोल फ्री नंबरला फोन केला. तक्रार रजिस्टर केली; मात्र ‘तारीख पे तारीख’ या व्यतिरिक्त त्यांना पुढे निकाल काहीच मिळाला नाही.

चिपळूण शाखेत बॅंक व्यवस्थापकांना पाच - सहावेळा भेटलो. मात्र तरीही टोलचे कापून गेलेले पैसे अद्याप परत मिळालेले नाहीत. गाडी घरात असतानाही एचडीएफसी बॅंकेच्या फास्ट टॅगमधून पैसे कट करून गाडी टोलनाक्‍यावरून गेल्याचे दाखविण्यात आले. या सर्व गंभीर बाबीचा तपास करावा व कापलेले पैसे परत मिळावेत, अशी मागणी अभिजित जाधव यांनी केली आहे. टोलची रक्कम जास्त नसली तरी घडलेला प्रकार चिंताजनक आहे. याबाबत वाहन चालक-मालक व नागरिकांमध्ये जागरूकता व्हावी, तसेच संबंधित कंपनी, बॅंक यांनी वापरलेल्या या प्रणालीत असलेले दोष तत्काळ दुरुस्त करावेत, असेही जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Forecast : ...अखेर मान्सून केरळमध्ये दाखल; विदर्भात पुढील 10-12 दिवस कसं असेल हवामान? यंदा 90 टक्के पावसाचा अंदाज

Chardham Yatra: बद्रीनाथ-केदारनाथ मंदिरासमोर 'छैंया-छैंया' गाण्यावर डान्स! मंदिर समिती अ‍ॅक्शन मोडमध्ये, VIP दर्शनासाठी नवी SOP जाहीर

लोक म्हणतात की मुलं पटापट मोठी होतात पण... मुलगा विहानला कसा वाढवणार आहे विकी कौशल; म्हणतो- आधी मला वाटायचं...

Yavatmal Shaktipeeth Controversy : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीत मोठा घोळ? शेकडो झाडांसह विहिरी गायब झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप; 451 आक्षेप दाखल

Tukaram Mundhe: 'तुकाराम मुंढेंना साखर आयुक्त करा!' माढ्यात दुग्धाभिषेक आंदोलन, शेतकरी-कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

SCROLL FOR NEXT